Join us  

रेल्वे प्रश्नांबाबत मोदींचे मौन

By admin | Published: October 13, 2014 10:59 PM

रोजगार निर्मितीचे प्रश्न याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज आपल्या भाषणात मौन पाळल्याने मतदारांची घोर निराशा झाली.

पालघर/ मनोर : या जिल्हय़ातील जनतेच्या जगण्या मरण्याची समस्या असलेले रेल्वेचे प्रश्न आणि पर्यावरण संवर्धनाचे तसेच रोजगार निर्मितीचे प्रश्न याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज आपल्या भाषणात मौन पाळल्याने मतदारांची घोर निराशा झाली. भाजपाला बहुमत दिल्यास महाराष्ट्रातील चांगल्या जिल्हयाच्या रांगेमध्ये पालघरला नेऊ असे भोंगळ आश्वासन त्यांनी दिले. 
मनोरच्या नांदगाव येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती. आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करताना पंतप्रधानांनी सांगितले की, सागरी, डोंगरी व नागरी असा त्रिवेणी संगम असलेल्या या भागाशी माङो जुने नाते असल्याचे सांगितले. इथले मच्छीमार मासेमारीला गुजरात मध्ये जातात. तर गुजरात मधील मच्छीमारांना इथले स्थानिक खूप सहकार्य करतात. त्यामुळे हे नाते जुने आहे. महाराष्ट्र व गुजरातच्या मच्छीमारांना पाकिस्तान सैनिकांनी तुरूंगात टाकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मच्छीमारांच्या 5क् बोटी व 2क्क् मच्छीमारांची सुटका करण्याचे कार्य केले. तर इराकमध्ये अडकलेल्या केरळच्या तरूणी सहीसलामत देशात परत आणले असल्याचे त्यांनी सांगितले.  
पालघर-डहाणू हा उपनगर भाग झपाटय़ाने वाढत असल्याने इथे चांगल्या रेल्वे सुविधा मिळाल्यास तरूणांना रोजगारांच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सागितले. सन 2क्12 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वष्रे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक माणसाला स्वत:चे घर, त्यामध्ये लाईट, पाणी, शौचालय तर शेजारी शाळा, रुग्णालय इ. सुविधा मिळणार असल्याचे स्वपA पंतप्रधान मोदींनी उपस्थित गरीबांना दाखविले. देशाच्या विकास करायचा असेल तर तरूणांना रोजगार द्यावा लागेल. आघाडी सरकारने स्कॅम महाराष्ट्र बनवला मात्र आम्ही भविष्यात स्कील महाराष्ट्र बनवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रात पूर्ण बहुमत आल्यास केंद्र व राज्य मिळून खांद्याला खांदा लावून विकास करू असेही शेवटी सांगितले. (वार्ताहर)
 
4त्यांच्या भाषणाला जनसमुदायामधून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता प्रतिसादासाठी त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करावे लागत होते.
4रेल्वे बजेट मध्ये मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर त्यांनी भाषणामधून नाशिक-डहाणू रेल्वे प्रस्तावाचा साधा उल्लेखही केला नाही. 
4पालघर-डहाणू येथे लांबपल्ल्यांच्या गाडय़ांना थांबा मिळावा या अनेक वर्षाच्या मागणीचा विचार सुद्धा केला नसल्याने त्यांची आश्वासनेही निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मते मागण्यासाठीची पोकळ आश्वासने असल्याचे मत काही उपस्थितांनी व्यक्त केले.