मोहरम जादूटोणा कायद्यात नाही -हायकोर्ट
By Admin | Published: December 10, 2014 02:12 AM2014-12-10T02:12:32+5:302014-12-10T02:12:32+5:30
मोहरम जादूटोणा कायद्याअंतर्गत येत नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला़
मुंबई : मोहरम जादूटोणा कायद्याअंतर्गत येत नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला़ विशेष म्हणजे न्यायालयाने हे प्रकरण सुओमोटो जनहित म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतले आह़े
याप्रकरणी न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी यासंदर्भात ठोस कारवाई केली जाणार असून, याचे चित्रीकरणही केले जाणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली़ तर याचिकाकत्र्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकाकत्र्याना धमकी दिली जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े अखेर न्यायालयाने वरील निर्वाळा देत ही सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली़ महत्त्वाचे म्हणजे मोहरमध्ये लहान मुलांचा सहभाग असल्याने यावर सुनावणी घेतली जाणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी नमूद केल़े
याप्रकरणी तीन मुस्लीम नागरिकांनी याचिका केली आह़े 25 ऑक्टोबर ते 4 डिसेंबर्पयत मोहरम पाळला जातो़ (प्रतिनिधी)