मोहन भागवत यांना मकोका लावण्याची मागणी; 'आरएसएस'कडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 02:24 AM2018-10-12T02:24:05+5:302018-10-12T02:24:43+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात मकोका लावून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Mohan Bhagwat demanded mcoca, The RSS is accused of being an illegal weapon | मोहन भागवत यांना मकोका लावण्याची मागणी; 'आरएसएस'कडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा आरोप

मोहन भागवत यांना मकोका लावण्याची मागणी; 'आरएसएस'कडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा आरोप

Next

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात मकोका लावून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या नावावर जिल्ह्याजिल्ह्यांत दंगली घडवल्या जात आहेत. दोन दिवस कर्फ्यू असताना संघाने रस्त्यावर बंदुका नाचवल्या. संघाकडे ही हत्यारे आली कुठून याचा शोध घ्यावा लागेल. नागपूर पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस त्याचा शोध घेतील असे वाटत नाही. सर्वसामान्य माणसांकडे साधे हत्यार सापडले, तरी त्याच्यावर कारवाई होते. मग कायद्यानुसार मोहन भागवत यांच्यावर मकोका लावण्याचे धाडस पोलीस दाखवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांनाही त्यांनी आवाहन केले. सर्व संघटनांकडे असणारी हत्यारे पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवीत. आज धरणे आंदोलनावर थांबत आहोत. मात्र प्रशासनाने ही हत्यारे काढून घेतली नाहीत, तर राज्यातील सर्व रस्ते बंद करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
केंद्र सरकार सध्या आॅक्सिजनवर आहे. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार व्हेंटिलेटरवर जाणाार आहे, असे भाकीतही आंबेडकर यांनी यावेळी केले. हिटलर होण्यासाठी हिटलरने आधी तेथील पोलीस खाते मारून टाकले होते. सत्ता जाण्याची वेळ आल्यावर याच संघटना तुमच्यावर बंदुका ताणल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशराही त्यांनी यावेळी दिला.

सैविधानिक पदाचा अपमान नको
मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे किंवा संघाचे हे माहीत नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री या पदावर असून संविधानिक पदावर बसलेले आहात. त्यामुळे संविधानिक पदाचा अपमान होऊ द्यायचा नसेल, तर ज्याच्या-ज्याच्याकडे एके४७ आहे; अशा सर्व संघटनांकडील हत्यारे जप्त केली पाहिजेत. नाहीतर खुर्ची गेल्यावर कायदा तुम्हाला सोडणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

‘एके ४७’साठी अर्ज करणार!
मलाही एके ४७ पाहिजे, यासाठी मी अर्ज करणार आहे. पोलीस खात्याकडे चालवण्याचे शिक्षण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका संघटनेकडे सर्व हत्यारे, तर दुसऱ्या संघटनेकडे काहीच हत्यारे नाहीत. म्हणून हा ‘इशारा मोर्चा’ काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले..

Web Title: Mohan Bhagwat demanded mcoca, The RSS is accused of being an illegal weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.