खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येच्या मुद्द्यावरुन विधानसभेत आज एकच गदारोळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. त्यावर आज विधानसभेत बोलताना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis यांनी डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव नसल्याचा दावा केला. फडणवीस यांचा हा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेटाळून लावला आहे.
"खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते", असा दावा अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी विधानसभेत केला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला.
भाजपकडून सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आणि राजकीय सूडापोटी राज्य सरकार काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर केलं. "डेलकर यांनी सुसाईड नोट लिहीली आहे. त्यात एका नावाचा उल्लेख आहे. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचा उल्लेख आहे. पटेल यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात आला. मला अडचणी येत होत्या. पटेल यांच्या माध्यमातून मला सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे", असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचं अनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितलं
डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेले प्रफुल्ल खेडा पटेल हे दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते याआधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात पटेल हे गुजरातचे गृहमंत्री होते, असा माझा कयास असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हणताच सभागृहात एकच गदारोळ उडाला.
एसआयटी मार्फत चौकशीमोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अनिल देशमुख यांनी केली.