Join us

मोहरमनिमित्त मिरवणुका

By admin | Published: November 05, 2014 3:56 AM

मुस्लीम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरमनिमित्त शहरातील विविध भागांत ताबूतांसह जुलूस काढले. गेल्या १० दिवसांपासून सुरू

परमेश्वर गडदे, मुंबईमुस्लीम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरमनिमित्त शहरातील विविध भागांत ताबूतांसह जुलूस काढले. गेल्या १० दिवसांपासून सुरू असणाऱ्या या मोहरममध्ये शहर-उपनगरांतील मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.शहरातील नागपाडा, जेजे, भेंडीबाजार, महमद अली रोड, मदनपुरा, दोनटाकी, कुर्ला, शिवाजीनगर, ट्रॉम्बे, चिताकॅम्प, माहीम, वांद्रे आणि जोगेश्वरी अशा वेगवेगळ्या भागांत प्रामुख्याने मोहरमचे वातावरण दिसून आले. मोहरमच्या अखेरच्या दिवसांत आझाद इमाम हुसेन आणि महंमद पैगंबर यांच्या कथांचे स्मरण मौलवी बांधवांना करून देतात. मोहरमच्या काळात दानधर्म आणि अन्नधान्य वाटप करण्याची परंपरा आहे. त्यानुसार ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी गरिबांना अन्न आणि सरबताचे वाटप केले. मंगळवारी मोहरमच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत हे जुलूस काढण्यात आले. मोहरमच्या अखेरच्या दिवसात शहर-उपनगरांतील मुस्लीम व्यावसायिक आणि चाकरमानीही वेळ काढून या दिवसाचे स्मरण करतात. नागपाडा विभागातील मोहरमला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. या काळात काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून मुस्लीम बांधव शोक व्यक्त करतात.