Mohit Kamboj: मला अटक करण्याच्या हालचाली, पण 'मै झुकूंगा नही'; मोहित कंबोज यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:35 PM2022-02-19T13:35:01+5:302022-02-19T13:38:36+5:30
कंबोज आणि राऊत यांच्यातही वाद रंगला आहे. आता, कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, मला अटक करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद घेतली. तेव्हापासून भाजप विरुद्ध संजय राऊत, भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत, एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन म्हणून मोहित कंबोज यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर, कंबोज आणि राऊत यांच्यातही वाद रंगला आहे. आता, कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, मला अटक करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.
"राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ," अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी अखेरिस भाजपच्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या नावाचाही उल्लेख करत ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फ्रन्टमॅन असल्याचंही म्हटलं. तसंच आपण त्यांना ओळखत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर मोहित कंबोज यांनी राऊत यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्याकडून २५ लाख रूपयांची मदत घेतल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, "संजय राऊत पैसे परत करा," अशी मागणीही कंबोज यांनी केली आहे.
जो करना हैं कर लो ,
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 19, 2022
मैं आपसे डरता नहीं हूँ ,
लोगों से धमकी भेजना बंद करो !
हर हर महादेव ! pic.twitter.com/7FVOF6Gxbs
आता मोहित कंबोज यांनी ट्विट करुन आपल्याला अटक करण्याचा डाव असल्याचे म्हटले. लोकांकडून धमक्या देणं बंद करा, जे करायचंय ते करा, मी तुम्हाला घाबरत नाही. हर हर महादेव... असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. तसेच, मला अनेक फोन आले आहेत, राज्य सरकारने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. कुठलिही केस बनवून मोहितला अटक करा, जर सत्य बोलणं आणि अन्यायाविरुद्ध लढणं हा गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे, असे मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. मै झुकुंगा नही... असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
मुझे बहुत फ़ोने आ रहे हैं की महाराष्ट्र सरकार ने आप को गिरफ़्तार करने के लिए आदेश दिए हैं ,कोई भी कसे बना कर मोहित को गिरफ़्तार करो !
अगर सही बात करना और अन्याय के ख़िलाफ़ लड़ना गुनाह हैं तो मैं गुनहगार हूँ!
मैं जेल जाने को डरता नहीं हूँ ,मैं तुमसे डरता नहीं ,
मैं झुकूँगा नहीं— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 19, 2022
यापूर्वी काय म्हणाले होते कंबोज?
यापूर्वी राऊत यांच्या वक्तव्यावर कंबोज यांनी प्रत्युत्तरही दिलं होतं. "संजय राऊत हे मला ओळखत नाहीत असं म्हणतात. तरीही दरवर्षी गणेशोत्सवात माझ्या घरी येतात. अनेकदा मी गरज भासल्यास त्यांना पैसेही दिले आहेत," असे मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. तसेच, संजय राऊत यांचा स्वत:च्या घरात सत्कार करतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला होता.