Join us  

भाजपात काहीतरी धुमसतेय? मोहित कंबोज यांचे ट्विट, "एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 4:59 PM

Mohit Kamboj Bharatiya : लोकसभा निवडणुकीचे काल निकाल समोर आले. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

Mohit Kamboj Bharatiya ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे काल निकाल समोर आले. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपाचा फक्त ९ जागांवर विजय झाला आहे. दरम्यान, यावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईत आज भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांची जबाबदारी घेतली असून त्यांनी पक्षाकडे'पक्षसंघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावं, अशी मागणी केली. दरम्यान, आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली आहे. 

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आज सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करुन भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यात भाजपाला मिळालेल्या कमी जागेवरुन नेत्यांना फटकारलं आहे. "फक्त एका व्यक्तीच महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं, असं पोस्टमध्ये मोहित कंबोज म्हणाले. या पोस्टमुळे कंबोज यांचा नेमका कोणावर रोख आहे, अशा चर्चा सुरू आहेत. 

मोहित कंबोज यांचे ट्विट काय?

"महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपला वास्तव तपासण्याची गरज आहे, या पराभवाची जबाबदारी कोण घेणार?", असा सवालही कंबोज यांनी केला आहे. 

"केवळ एका व्यक्तीसाचं महत्व कमी करण्यात पक्षाचे नुकसान झाले, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, मंत्रीही भाजपाच्या पराभवाला जबाबदार आहेत, असंही मोहित कंबोज म्हणाले. 

दरम्यान, भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या या पोस्टनंतर त्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्यावर आहे या चर्चा सुरू आहेत. तर महाराष्ट्रा भाजपामध्ये धुसफूस सुरू आहेत का? अशा चर्चा सुरू आहेत. 

जबाबदारी फडणवीसांनी घेतली"महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फार अंतर नाही. मतांची टक्केवारीही जवळपास सारखीच आहे. मात्र महाविकास आघाडीच्या मतांचं एकत्रिकरण झाल्यामुळे त्यांच्या जास्त जागा आल्या. मात्र असं असलं तरी राज्यात आमच्या जागा कमी आल्या, याची जबाबदारी मी स्वत: घेत आहे," असंही फडणवीस म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावं, अशी मागणी मी पक्षनेतृत्वाकडे करणार आहे," अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयभाजपालोकसभा निवडणूक २०२४ निकालदेवेंद्र फडणवीस