रणजितसिंह मोहिते भाजपात; मात्र उमेदवारीबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 06:07 AM2019-03-21T06:07:33+5:302019-03-21T06:08:23+5:30
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते खा.विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते खा.विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. रणजितसिंह यांना त्यांचे वडील विजयदादांचा आशीर्वाद आहेच, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत कोणीही
उल्लेख न केल्याने संभ्रम कायम आहे.
वानखेडे स्टेडियमच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि दानवे यांनी मोहिते घराण्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली. काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांना लोकसभेची अहमदनगरमधून उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. मात्र, आज रणजितसिहं मोहितच्ें ाी उमदे वारी त्यांनी माढामधून जाहीर केली नाही.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण या महत्त्वाकांक्षी योजनेची कल्पना विजयदादांनी मांडली; पण तेव्हाच्या सरकारने नाही तर फड सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील, या विश्वासाने आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले.
माढा मतदारसंघातून आता भाजपाच निवडून येणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एका मोहिते समर्थकाने, ‘साहेब! माढ्यावर सोलापूर फ्री, तिथेही नक्की जिंकू’ असे म्हणत हशा पिकविला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय देशमुख, सदाभाऊ खोत, सोलापूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.
यावेळी रणजितसिंह मोहिते यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, शिवामृत दूधचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील,पंचायत समितीच्या सभापती वैष्णवदेवी मोहिते पाटील उपसभापती किशोर सूळ, सोलापूरचे माजी महापौर प्रवीण डोंगरे, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील आदींनी भाजपात प्रवेश केला.
सुभाषबापूंची घाई
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रणजितसिंह यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले त्याच्या आधी माईकचा ताबा घेतला. तुम्ही भाजपात आलात हे ठीक आहे; पण त्याचा पुरावा काय, असा प्रश्न करून त्यांनी मोहिते समर्थकांना बुचकाळ्यात पाडले आणि लगेच भाजपा सदस्य नोंदणीचा मोबाइल नंबर सांगत तो प्रत्येकाला डायल करायला सांगितला. हा नंबर डायल करताच सगळे भाजपाचे प्राथमिक सदस्य झाले.
कोण आहेत रणजितसिंह?
राज्यसभेचे माजी सदस्य
बॉडीबिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक.