महावितरणवर धडक मोर्चा

By Admin | Published: January 4, 2015 12:11 AM2015-01-04T00:11:53+5:302015-01-04T00:11:53+5:30

महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जुईनगरमधील रहिवाशांनी नेरूळ कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला.

Mokhidharna Dhadak Morcha | महावितरणवर धडक मोर्चा

महावितरणवर धडक मोर्चा

googlenewsNext

नवी मुंबई : महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जुईनगरमधील रहिवाशांनी नेरूळ कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला. घरगुती वापराच्या विजेवरील सबसिडी बंद करण्याचा निषेध तसेच बिलांमधील त्रुटींबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासनाने औद्योगिक वापराच्या विजेवरील सबसिडी कायम ठेवली आहे. परंतु घरगुती ग्राहकांची सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विजबिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होऊन या निर्णयाचा निषेध केला. बिलावरील मिटरचा फोटो अस्पष्ट दिसतो. बिले वेळेवर दिली जात नाहीत. प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत असल्याची टिका प्रकल्पग्रसत कृती समितीचे नेते डॉ. राजेश पाटील यांनी मोर्चादरम्यान केली. महावितरण प्रशासनाने या समस्या सोडविल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. एन. पाटील यांची भेट घेऊन समस्यांविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. राजेश पाटील,नगरसेवक काशीनाथ पाटील, मनोहर पाटील, नारायण पाटील, हरिभाऊ पाटील, आसावरी परब, अंजना ताडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

 

Web Title: Mokhidharna Dhadak Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.