सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुलाचा शिपायाकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:21 AM2018-04-04T04:21:45+5:302018-04-04T04:21:45+5:30

ठाणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाच्या १५ वर्षाच्या मुलाच्या विनयभंगप्रकरणी मुलुंड पोलिसांनी वाहतूक पोलीस शिपाईला बेड्या ठोकल्या आहेत. प्रमोद ठोंबरे असे शिपाईचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Molestation of Assistant Sub-Inspector's Child | सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुलाचा शिपायाकडून विनयभंग

सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुलाचा शिपायाकडून विनयभंग

googlenewsNext

मुंबई - ठाणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाच्या १५ वर्षाच्या मुलाच्या विनयभंगप्रकरणी मुलुंड पोलिसांनी वाहतूक पोलीस शिपाईला बेड्या ठोकल्या आहेत. प्रमोद ठोंबरे असे शिपाईचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
ठोंबरे हा काळबादेवी येथील वाहतूक विभागात कार्यरत आहे. तो मुलुंडमध्ये राहण्यास आहे. ३१ मार्चला त्याने १५ वर्षाच्या मुलाला घरी बोलावून घेतले. परीक्षा, पुढील शिक्षणाविषयीची योजना अशा विषयांवर गप्पा मारण्यास सुरुवात केली. तरुणाने आपल्याला नौदलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरुन टिप्स देण्याच्या नावाखाली ठोंबरेने मुलाला कपडे काढण्यास सांगितले. त्याच्यासोबत अश्लील चाळे केले. याबाबत मुलाने घराकडे धाव घेतली. हा प्रकार कुटूंबियांना समजताच त्यांनी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Web Title: Molestation of Assistant Sub-Inspector's Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.