Join us

सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुलाचा शिपायाकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:21 AM

ठाणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाच्या १५ वर्षाच्या मुलाच्या विनयभंगप्रकरणी मुलुंड पोलिसांनी वाहतूक पोलीस शिपाईला बेड्या ठोकल्या आहेत. प्रमोद ठोंबरे असे शिपाईचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

मुंबई - ठाणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाच्या १५ वर्षाच्या मुलाच्या विनयभंगप्रकरणी मुलुंड पोलिसांनी वाहतूक पोलीस शिपाईला बेड्या ठोकल्या आहेत. प्रमोद ठोंबरे असे शिपाईचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.ठोंबरे हा काळबादेवी येथील वाहतूक विभागात कार्यरत आहे. तो मुलुंडमध्ये राहण्यास आहे. ३१ मार्चला त्याने १५ वर्षाच्या मुलाला घरी बोलावून घेतले. परीक्षा, पुढील शिक्षणाविषयीची योजना अशा विषयांवर गप्पा मारण्यास सुरुवात केली. तरुणाने आपल्याला नौदलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरुन टिप्स देण्याच्या नावाखाली ठोंबरेने मुलाला कपडे काढण्यास सांगितले. त्याच्यासोबत अश्लील चाळे केले. याबाबत मुलाने घराकडे धाव घेतली. हा प्रकार कुटूंबियांना समजताच त्यांनी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

टॅग्स :मुंबईपोलिसगुन्हा