मुंबईत ओला कॅबमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:25 AM2018-02-16T03:25:49+5:302018-02-16T03:25:58+5:30

ओला कॅबमध्ये असलेल्या महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी क्राइम ब्रांचच्या कक्ष १२ने एकाला पवईतून ताब्यात घेत, आरे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Molestation of woman in Ola cab, arrested accused in Mumbai | मुंबईत ओला कॅबमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

मुंबईत ओला कॅबमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

Next

मुंबई : ओला कॅबमध्ये असलेल्या महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी क्राइम ब्रांचच्या कक्ष १२ने एकाला पवईतून ताब्यात घेत, आरे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ओमप्रकाश बेहरा (२७) असे आरे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने आयटी इंजिनीअर असल्याचे समजते. बेहरा आणि सीमा (नावात बदल) हे दोघे ओला शेअरमधून मालाडवरून पवईच्या दिशेने निघाले होते. बेहरे हा पुढच्या सीटवर होता. तर कॉल सेंटरमध्ये काम करणारी सीमा मागच्या सीटवर होती.
बेहराने कार सीट मागे करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा हात सीमाच्या ढोपराला लागला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. हा प्रकार आरे पोलिसांच्या हद्दीत घडला. मात्र, भांडता भांडता ओला कार अंधेरी एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत पोहोचली. तेव्हा सीमाने बेहराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तो आरे पोलिसांना वर्ग करण्यात आला. याबाबतचा तपास क्राइम ब्रांचच्या कक्ष १२चे प्रमुख महेश निवतकर आणि त्यांचे पथक करत होते. त्यांनी चौकशी करत बुधवारी उशिरा रात्री बेहराला ताब्यात घेतले. तसेच चौकशीअंती त्याला पुढील तपासासाठी आरे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. बेहराला ओळख परेडमध्ये सीमाने ओळखले आहे. त्यानंतर आरे पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

Web Title: Molestation of woman in Ola cab, arrested accused in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा