अखेर रखडलेल्या १३ उपअधीक्षकांच्या पदोन्नतीला मुहूर्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:05 AM2021-04-25T04:05:27+5:302021-04-25T04:05:27+5:30
एका आयपीएसची बदली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील १३ पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या जवळपास गेल्या दोन ...
एका आयपीएसची बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील १३ पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस अधीक्षकपदाच्या पदोन्नतीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. त्याचबरोबर आयपीएस अतुल कुलकर्णी यांच अपर पोलीस अधीक्षक (गोंदिया) या पदावरून अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथे बदली करण्यात आली.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक असते. गृह विभागाने २०११-१२ या वर्षीच्या उपअधीक्षकांच्या तुकडीतील सर्व १३ जणांच्या बढतीसह कुलकर्णी यांच्या बदलीचा प्रस्ताव एकत्रित तयार केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता घेण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस तो मुख्यमंत्री कार्यालयात पाठविला होता. जवळपास २ महिने तो प्रलंबित हाेता. अखेर गुरुवारी त्याला मंजुरी मिळून तो गृह विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्याबाबतचे आदेश जारी केले.
* पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात सध्याचे व नवनियुक्तीचे ठिकाण)
वैशाली विठ्ठल शिंदे (पुणे शहर ते लोहमार्ग, नागपूर), अभय डोंगरे (सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), वैशाली माने (सीआयडी, पुणे ते पोलीस उपायुक्त, मुख्यालय, अमरावती), रूपाली दरेकर (सोलापूर शहर ते नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद), अनिता जमादार (एसीबी, औरंगाबाद ते महामार्ग सुरक्षा पथक, औरंगाबाद), किशोर काळे (सांगली ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे), अमोल झेंडे (एसबी, नवी मुंबई ते नागरी हक्क संरक्षण, ठाणे), प्रदीप जाधव (नाशिक शहर ते महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), अशोक बनकर (एसबी, औरंगाबाद ते गोंदिया), डॉ. शिवाजी पवार (पुणे शहर ते महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), रमेश धुमाळ (एसीबी मुंबई ते सहायक महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई), अशोक थोरात (सातारा ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला) व अशोक नखाते (नाशिक शहर ते उपसंचालक, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक)
* १९ सहायक निरीक्षकांनाही बढती
राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या १९ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. खातेनिहाय, विभागीय चौकशी, निलंबन कालावधी निश्चित न होणे आणि पदोन्नतीतील आरक्षण आदी मुद्द्यांमुळे त्यांची बढती रखडली होती. १९ पैकी दोघांना ‘मॅट’च्या आदेशानुसार बढती देण्यात आली.
........................................