स्मारकाला रिपब्लिकन सेनेचा विरोध

By admin | Published: October 28, 2015 12:07 AM2015-10-28T00:07:13+5:302015-10-28T00:07:13+5:30

इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाला रिपब्लिकन सेनेने विरोध केला आहे.

Monarchy opposes the Republican army | स्मारकाला रिपब्लिकन सेनेचा विरोध

स्मारकाला रिपब्लिकन सेनेचा विरोध

Next

मुंबई : इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाला रिपब्लिकन सेनेने विरोध केला आहे. प्रस्तावित स्मारकाच्या आराखड्यात बदल केला नाही, तर रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.
आंबेडकर म्हणाले की, ‘स्मारकाच्या भूमिपूजनाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी आंबेडकरी संघटनांसोबत चर्चा करून, योग्य वाटल्यास आराखड्यात बदल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर अद्याप एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.’
निविदांमध्येही पारदर्शकता नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले की, ‘आघाडी सरकारने नेमलेल्या सुकाणू समितीला विश्वासात न घेता, हा आराखडा तयार केला गेला. संबंधित आराखड्यात बाबासाहेबांचा ३६० फुटांचा ‘स्टॅच्यू आॅफ इक्वालिटी’ म्हणजेच ‘समतेचा पुतळा’ दिसत नाही. कृत्रिम गवतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाडे लावण्याचा दिलेला सल्लाही वास्तवदर्शी नाही. याउलट रिपब्लिकन सेनेने दिलेल्या आराखड्यात २० टक्के बांधकाम आणि ८० टक्के हिरवळीचा समावेश आहे.’ (प्रतिनिधी)

Web Title: Monarchy opposes the Republican army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.