मुंबई : भरती-ओहोटी कधी आहे, कुठे किती पाऊस पडला आहे, कुठे किती आर्द्रता आहे, वारे किती वेगाने वाहत आहेत आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे़ मुंबईकरांच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पालिकेच्या मान्सून संकेतस्थळावर मिळतीलमुंबईकरांना अॅलर्ट करता यावे, त्यांना मान्सूनसंदर्भातील माहिती देता यावी, म्हणून महापालिका प्रशासनाने मुंबई मान्सून डॉट इन हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मुंबई शहराच्या नकाशासह स्वयंचलित हवामान केंद्राहून संबंधित ठिकाणावरील हवामान, आर्द्रता आणि पावसाची नोंद मुंबईकरांना मिळणार आहे. शिवाय, भरती आणि ओहोटीची तारीख आणि वेळ यासंबंधीची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील नद्या, वॉर्ड मॅप, वॉर्ड डिक्शनरी आदी माहिती या संकेतस्थळाहून मुंबईकरांना मिळणार आहे. सध्या तरी काही तांत्रिक कारणात्सव भरती-ओहोटीसह काही बाबींची माहिती अपलोड करण्यात येत नसली तरी पुढे यात आणखी सुधारणा करत मुंबईकरांना अपडेट करण्यासाठी यात बदल करणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
अॅलर्ट करणार मान्सूनचे संकेतस्थळ!
By admin | Published: June 16, 2014 3:05 AM