लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव येथील दोन चिमुरड्यांनी त्यांच्या पिगी बँकेत जमा झालेली रक्कम चक्क राम मंदिर उभारणीसाठी देऊन खारीचा वाटा उचलला.
गोरेगावचे संघचालक व कारसेवक कै. स.दि. ऊर्फ दादा वैद्य यांच्या नातवंडांनी पिगी बँकेमध्ये जमलेली रक्कम श्री राम मंदिर उभारणीसाठी दिली. निधी संकलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पिगी बँकमध्ये जमलेली संपूर्ण रक्कम देऊन सुखद धक्का दिला.
घरात खाऊ व बक्षिसाचे पैसे मुले पिगी बँकेत जमा करतात. पार्थ व तनिष्का याला अपवाद नाही. कार्यकर्ते घरी आल्यावर त्यांनी पिगी बँक उघडली. तनिष्काच्या पेटीतून पाच हजार रुपये व पार्थच्या पेटीतून एक हजार रुपये निघाले असता त्यांनी सदर रक्कम राम मंदिर उभारणीसाठी दिली.
याच इमारतीत राहणाऱ्या नववीतील कमला वझे या अयोध्येला कारसेवक म्हणून गेल्या होत्या. त्यांच्या बचतीतील एक हजार रुपयांची देणगी देऊन राम मंदिर उभारणीचे स्वप्न साकार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
---------------------------