Join us

युवांसाठी ‘मनी माइंड नेव्हर माइंड’

By admin | Published: August 21, 2015 11:26 PM

आपण किती पैसा कमवितो यापेक्षा त्याचे नियोजन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे

ठाणे : आपण किती पैसा कमवितो यापेक्षा त्याचे नियोजन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पैशांचे नियोजन कसे करावे, याची सवय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनापासून लागावी याचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि एनएसडीएल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘मनी माईंड नेव्हर माईंड’’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मनी मार्इंडेड असणे हा एकेकाळी अवगुण समजला जात असे. परंतु, आता लहानांपासून मोठयांपर्यन्त पैशाचे थोडे तरी नियोजन करणे हे गरजेचे झाले आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे नियोजन विद्यार्थी दशेपासूनच करणे आवश्यक आहे. पैशांअभावी त्यांच्या करियरचे स्वप्न अर्धवट राहू नये म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत युवांसाठी वन मिनिट गेम शो आणि गुंतवणूकीची माहिती देणारी कार्यशाळाही घेण्यात येणार आहे.