Join us

जिद्दीचा स्ट्रेट ड्राइव्ह! रेल्वे अपघातानंतर हाताचे प्रत्यारोपण झालेली मोनिका मोरे बॅटिंग करते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:35 PM

रेल्वे अपघातानंतर दोन्ही हात गमविलेल्या मोनिका मोरे  हिच्या दोन्ही हाताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

मुंबई-

रेल्वे अपघातानंतर दोन्ही हात गमविलेल्या मोनिका मोरे  हिच्या दोन्ही हाताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यात हातांची नियमित हालचाल होण्यास सुरुवात करण्यास सुरुवात केली आहे. काल मोनिकानं चक्क हातात बॅट घेऊन बॅटिंग केली.

२०१४ साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीनं दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया २८ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आली होती. परळ येथील ग्लोबल रुग्णलयात शस्त्रक्रिया पार पडली होती. त्याकरिता १५ तासांचा अवधी लागला होता तसेच ३५ ते ४० डॉक्टरांचा यामध्ये सहभाग होता. डॉ. निलेश सातभाई यांनी या संपूर्ण शस्त्रक्रियांचे नेतृत्व केलं होतं. मायक्रोव्हयस्कुलर, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन आणि अॅनेस्थेसिस्ट या विविध विषयातील तज्ञांचा या टीममध्ये समावेश होता. तिच्या दोन्ही हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  

मोनिका महाराष्ट्रातील हाताचे प्रत्यारोपण  करणारी पहिली मुलगी आहे. त्यानंतर अशा आणखी ५ ते ६ व्यक्तींवर हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कुर्ला येथे राहणाऱ्या मोनिकाच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झालं होतं. अपघात झाल्यानंतरही जिद्दीनं मोनिकानं आपलं पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

टॅग्स :रेल्वे