‘मोनो’ डार्लिंग पुन्हा धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 01:34 AM2020-06-26T01:34:55+5:302020-06-26T01:35:04+5:30
चेंबूर ते वडाळा या मार्गावर चाचणीदरम्यान धावणारी मुंबापुरीची आकर्षक अशी मोनो डार्लिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा एक भाग म्हणून मोनोरेलची चाचणी घेतली जात आहे. मागील आठवड्याभरापासून मोनोरेलची चाचणी घेतली जात असून, चेंबूर ते वडाळा या मार्गावर चाचणीदरम्यान धावणारी मुंबापुरीची आकर्षक अशी मोनो डार्लिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबापुरीतल्या बेस्ट, लोकल, मेट्रोप्रमाणे मोनोरेलची सेवादेखील ठप्प झाली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल थांबली. एक - दोन नव्हे, तर तब्बल अडीचएक महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेलची सेवा आजही बंदच आहे. मात्र ऐनवेळी जेव्हा मोनो प्रत्यक्षात धावू लागेल; तेव्हा प्रशासनासमोर ऐनवेळी अडचणी येऊ नयेत, म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून मोनोरेलच्या देखभाल- दुरुस्तीची कामे सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरापासून तर मोनोरेलच्या देखभाल-दुरुस्तीने आणखी वेग पकडला आहे.
अडचणी सुरू असतानाच कालांतराने एमएमआरडीएने मोनो स्वत:च चालविण्याचा निर्णय घेतला. एकूण व्यवस्था आटोक्यात आल्यावर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि आता भारत-चीन वाद सुरू असतानाच मुंबईतल्या चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणाºया मोनोरेलसाठी दोन चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रद्द केल्या. ंं