Join us

लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 4:23 AM

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले सुटे भाग मलेशियाहून शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई  - मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले सुटे भाग मलेशियाहून शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत़ मोनोरेलच्या दुस-या टप्प्यातील म्हणजे वडाळा ते संत गाडगे महाराज चौकादरम्यान आता लवकरच मोनोरेल धावेल, असा आशावाद मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनोच्या दुसºया टप्प्यासाठीचे मोनोचे सुटे भाग मलेशियाहून मुंबईत दाखल झाले आहेत. दुसºया टप्प्याचे काम आणखी वेगाने सुरु होईल. हा टप्पा सुरु होण्यास आणखी विलंब होणार नाही. एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांच्या म्हणण्यानुसार, दुसºया टप्प्याच्या निमित्ताने आणखी चार मोनोरेल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत़ याने अधिकाधिक प्रवासी मोनोरेलकडे आकर्षित होतील, अशी आशा आहे. मोनोच्या संपूर्ण मार्गावर एकूण सात मोनोरेल चालविल्या जातील.

टॅग्स :मोनो रेल्वेमुंबई