मोनो तीन दिवसांच्या खंडानंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:22 AM2019-08-06T01:22:19+5:302019-08-06T01:22:27+5:30

पाचपैकी तीन गाड्या सेवेत; वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड

Mono starts after a three-day break | मोनो तीन दिवसांच्या खंडानंतर सुरू

मोनो तीन दिवसांच्या खंडानंतर सुरू

Next

मुंबई : जेकब सर्कल-वडाळा- चेंबूर या मार्गावर धावणारी मोनो शनिवारपासून ठप्प आहे. पण सोमवारपासून मोनोच्या पाचपैकी तीन गाड्या सेवेत दाखल करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे.

मोनोरेल्वेला डीसी वीजपुरवठा करणारी यंत्रणा रविवारी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कुचकामी ठरल्याने मोनोेची सेवा तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला होता. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तांत्रिक कारणास्तव मोनोरेल्वे सेवा बंद पडली. मोनो धावण्यासाठी आवश्यक वीज पुरवठा करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्याने मोनो चालविणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले होते.

मोनो ही डीसी वीजपुरवठ्यावर धावत असून, मोनोला वीजपुरवठा करणाºया यंत्रणेचे काम युकेमधील ‘फेव्हेली ब्रेकनेल विलीस’ या कंपनीला दिले आहे. या यंत्रणेची ३० ते ४० दिवस चालण्याची क्षमता जोरदार पावसामुळे १० ते १५ दिवसांवर आली आहे. पण जोपर्यंत पुढील मानधन मिळत नाही, तोपर्यंत या कंपनीने वीजपुरवठा यंत्रणा तयार न करण्याचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली. पण प्राधिकरणाने पुण्यातील एका कंपनीकडून तत्काळ ही यंत्रणा उपलब्ध करत मोनोची सेवा सुरू केली आहे.

मोनोची रखडपट्टी सुरूच
मोनोरेल्वेच्या मार्गातील अडथळे अद्याप सुरूच आहेत. यापूर्वीही मोनो विविध कारणांनी बंद पडली होती. नोव्हेंबर, २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली होती. त्यानंतर, मोनो दहा महिने बंद होती, तर गेल्याच आठवड्यात मोनोरेल्वेच्या मार्गावर झाडाच्या फांद्या पडल्याने मोनो बंद पडली, तसेच त्यापूर्वी इंटरनेट केबल चाकामध्ये अडकल्यामुळे चेंबूर नाक्यावर मोनोरेल्वे बंद पडली. यावेळी अनेक प्रवासी मोनोमध्ये अडकले होते. त्या प्रवाशांना अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर या प्रवाशांची सुटका करण्यात आली. त्यामुळे जे प्रवासी मोनोवर भरवसा ठेवून प्रवास करतात, त्यांना आता हा प्रवास बिनभरवशाचा वाटू लागला आहे. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा द्यायचा असेल, तर मोनोच्या अडचणी दूर कराव्या लागणार आहेत.

लवकरच दर सहा मिनिटांनी मोनोच्या फेºया
मोनोरेल्वेचे व्यवस्थापन स्कोमी कंपनीकडे होते. मात्र, योग्य प्रकारे व्यवस्थापन होत नसल्याने, एमएमआरडीए प्रशासनाने डिसेंबर, २०१८ मध्ये व्यवस्थापनाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यावेळी फक्त दोनच मोनो कार्यरत होत्या. मोनोचे दोनही टप्पे सुरू झाल्यानंतर, मोनोच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला. त्यानुसार, सध्या मोनोच्या ताफ्यामध्ये पाच मोनो कार्यरत आहेत, तर दोन बंद असलेल्या मोनोंची दुरुस्ती करून सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण सात मोनो प्राधिकरणाच्या ताफ्यात असतील, तर आणखी दहा मोनो एमएमआरडीए विकत घेणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असून, येत्या २१ महिन्यांमध्ये या दहा मोनो मोनोच्या ताफ्यात सामील होतील. यानंतर, मोनोच्या ताफ्यात एकूण सतरा मोनो असतील. सध्या या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना २० ते २५ मिनिटे मोनोची वाट पाहावी लागत आहे. सतरा मोनो कार्यरत झाल्यावर दर सहा मिनिटांनी मोनोच्या फेºया होणार असल्याचे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Mono starts after a three-day break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.