Join us

‘मोनो’ लवकरच धावणार, फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:18 AM

फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेवेत : दुसऱ्या टप्प्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा

मुंबई : चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यात धावणारी मोनोरेल वडाळा ते महालक्ष्मी येथील या संत गाडगे महाराज चौक या दुसºया टप्प्यात कधी धावणार? याबाबतची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसºया टप्प्यातील म्हणजे वडाळा ते महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौकदरम्यान मोनोरेल धावणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा प्राप्त झाला नाही़ तरीदेखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर लवकरच दुसºयाही टप्प्याचा श्रीगणेशा होणार आहे. एमएमआरडीए वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावरून मोनोरेल सुरू करण्यासाठी तत्पर असतानाच गेल्या आठवड्यात मोनोरेलच्या दुसºया टप्प्यासाठी आवश्यक असलेले सुटे भाग मलेशियाहून मुंबईत दाखल झाले होते. मात्र हे सुटे भाग जोडण्यासाठी किमान ४५ दिवस म्हणजे सात आठवडे लागतात. याबाबतची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू असून, दुसरा टप्पा केव्हा कार्यान्वित होणार? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.आगीच्या घटनेमुळे काही दिवस बंद होती सेवामुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर मोनोरेलचे काम हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला चेंबूर-वडाळा या मार्गावर मोनो धावत असतानाच प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मोनो तोट्यात होती. मोनोरेल मार्गावर घडलेल्या आगीच्या घटनेनंतर काही दिवस मोनो बंदच होती.मोनोरेल नक्की कोणी चालवायची? या मुद्द्यावरून एमएमआरडीए आणि स्कोमीमध्ये वाद निर्माण झाले होते. या वादानंतर एमएमआरडीएने मोनो चालविण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. काही दिवसांनंतर मोनो पुन्हा पहिल्या टप्प्यात धाऊ लागली तरी दुसºया टप्प्याबाबत प्राधिकरणाकडून अद्याप काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :मुंबई