मोनो सुरू होणार, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:13 AM2018-08-28T06:13:10+5:302018-08-28T06:13:27+5:30

तांत्रिक अडचणींचे ‘विघ्न’ दूर होणे गरजेचे

Mono will start, but ... | मोनो सुरू होणार, पण...

मोनो सुरू होणार, पण...

googlenewsNext

मुंबई : वाहतुकीची समस्या कमी व्हावी यासाठी एमएमआडीएने मोनोरेलचा घाट घातला. सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांचा रतीब घालून मोनोरेल सुरु झाली. मात्र सततच्या अपघातांमुळे ती कधी सुरळीत धावलीच नाही. मात्र मोनोरेलची सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होणार असून तब्बल १० महिन्यांनी मोनोरेलचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. नोव्हेंबर २०१७ ला आग लागल्याच्या कारणामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली. या घटनेपासून मोनोरेलचा पहिला टप्पा बंद झाला होता.

सध्या एमएमआरडीएला मोनोरेलमधून ५ ते ६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. चेंबूरपासून ते वडाळ्यापर्यंत मोनो रेलची सेवा सुरु करण्यात येणार आहे. मात्र वडाळा ते जेकब सर्कलपर्यंत मोनो रेल सुरु करण्यात अपयश येत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा करण्यास काही कालावधी जाऊ शकतो, असे सुत्रांचे म्हणणे आहे. चेंबूर ते वडाळा स्थानकापर्यंत मोनो रेलची सेवा प्रवाशांसाठी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोनो रेलची सेवा सुरू करण्यात येणार आहे की नाही ? याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत होती. मात्र आता यास पूर्णविराम लागला असून १ सप्टेंबरपासून मोनो रेल पुन्हा धावणार आहे. सुरक्षाविषयक बदल करुन १ सप्टेंबर २०१८ पासून मोनोरेलचा पहिला टप्पा वडाळा-चेंबूर पुन्हा सुरु होत आहे. याविषयीची चर्चा करण्यासाठी मनसे रस्ते-आस्थापना विभागाचे शिष्टमंडळ मोनोरेलचे मुख्य मुर्ती आणि त्यांच्या सहकारी वर्गास भेटले असता, मोनोरेल कधी सुरु होणार हे लेखी स्वरुपात द्यावे, मोनोरेलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची लेखी हमी द्यावी, मोनोरेलची सद्यस्थितीचे विश्लेषण करावे, नोव्हेंबर २०१७ च्या अपघातानंतर काय कारवाई झाली याची माहिती द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, सुरक्षाविषयक पडताळणीसाठी मोनोरेलने रस्ते आस्थापना टिमला मोनोरेलच्या राईडसाठी मंगळवारी आमंत्रित केले आहे.
बैठकीत मनसेचे उपाध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष योगेश चिले, उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे, प्रभाग संघटक संदीप राणे, प्रभाग संघटक बिपीन शिखरे, प्रभाग संघटक दिनेश उपस्थित होते.
 

Web Title: Mono will start, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.