लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सून एखाद्या ठिकाणी दाखल झाला, म्हणजे संबंधित ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, असे नसते. मान्सून दाखल झालेल्या ठिकाणी तो अॅक्टिव्ह झाल्यानंतरही अनुकूल वातावरणासाठी मान्सून प्रणाली कार्यरत राहाणे आवश्यक असते. मान्सूनमधील प्रणाली कार्यरत राहिल्यास, साहजिकच मुंबईमध्ये पावसाच्या सरी बरसतील, असे स्पष्टीकरण मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मान्सूनने घेतलेल्या ब्रेकवर दिले आहे. असे असले तरीदेखील मुंबापुरीत काही अंशी मान्सून सरी कोसळत असून, याचाच प्रत्यय सोमवारी सकाळी अंधेरी, गोरेगाव आणि पार्लेकरांना आला. येत्या ४८ तासांत मुंबईत मान्सून सक्रीय होईल असेही हवामान खात्याने सांगितले आहे.
मुंबईत ४८ तासांत मान्सून सक्रीय
By admin | Published: June 20, 2017 2:50 AM