मान्सून सक्रिय; तीन दिवस मारा कायम; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:45 AM2020-08-15T00:45:42+5:302020-08-15T06:54:35+5:30

मुंबईत शुक्रवारी पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १७ ठिकाणी झाडे कोसळली, तर ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

Monsoon active heavy rain in next three days | मान्सून सक्रिय; तीन दिवस मारा कायम; हवामान खात्याचा अंदाज

मान्सून सक्रिय; तीन दिवस मारा कायम; हवामान खात्याचा अंदाज

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी पावसाचा जोर कायम होता. सकाळी रिमझिम सुरू असलेल्या पावसाने दुपारी चांगला जोर पकडला होता. सायंकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. मान्सून पुन्हा एकदा वेगाने सक्रिय झाला असून, पुढील ३ दिवस पावसाळी वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत शुक्रवारी पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १७ ठिकाणी झाडे कोसळली, तर ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता मुंबईत १४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, शुक्रवारी पहाटे गिरगाव येथे भुलेश्वर रोडवरील तळमजला अधिक चार मजली लायब्ररी इमारतीच्या भिंतीचा भाग पडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

ढगात हरवली मुंबई? व्हिडीओ व्हायरल
सोशल नेटवर्किंग साइट्स म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवर शुक्रवारी दुपारनंतर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. लोअर परळ, वरळी येथील लोढा वर्ल्ड टॉवर्समधील वर्ल्ड वनच्या ८० व्या माळ्याहून टिपण्यात आलेले हे दृश्य आहे, असा दावा या व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांनी केला.
यामध्ये हा परिसर संपूर्णपणे ढगात हरविल्याचे दृश्य होते. इमारतींवरही ढग होते. मुंबई जणू काही ढगात हरविल्याचे चित्र होते. ढग वेगाने पुढे सरकत होते आणि उंच इमारती सोडल्या तर केवळ ढग आणि ढगच दिसत होते. एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील दृश्य भासावे असा हा व्हिडीओ होता. मात्र तो मुंबईतीलच आहे का, याबाबत मात्र कोणीच दुजोरा दिला नाही.
हवामान खात्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मान्सून सक्रिय असतो तेव्हा वातावरण असे असते. ढग खाली उतरतात. अगदी इमारतीजवळही येतात. म्हणजे कमी उंचीवर येतात. मुंबईत बहुतांश वेळेला असे चित्र असते. मात्र शुक्रवारी सोशल नेटवर्क साइटवर जो व्हिडीओ व्हायरल झाला तो मुंबईतलाचा असावा, याबाबत मात्र काहीच सांगता येणार नाही.

Web Title: Monsoon active heavy rain in next three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.