मान्सून लहरी झाला; वादळासह ढगफुटी १५ टक्क्यांनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:09 AM2021-08-17T04:09:02+5:302021-08-17T04:09:02+5:30

मुंबई : जमिनीवर झालेला बदल, तापमान वाढ आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे मान्सून लहरी झाला आहे. गेल्या वीस वर्षांत वादळाचे ...

The monsoon became erratic; Cloudburst increased by 15% with storm | मान्सून लहरी झाला; वादळासह ढगफुटी १५ टक्क्यांनी वाढली

मान्सून लहरी झाला; वादळासह ढगफुटी १५ टक्क्यांनी वाढली

Next

मुंबई : जमिनीवर झालेला बदल, तापमान वाढ आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे मान्सून लहरी झाला आहे. गेल्या वीस वर्षांत वादळाचे आणि ढगफुटीचे प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्याची माहिती पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांनी दिली. २००१ पासून आपत्कालीन घटनांचे प्रमाण वाढले आहे.

मान्सूनचा तीस वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला, तर मान्सूनच्या तारखा बदलत गेल्या. कमी दिवसांत जास्त पाऊस नोंदविला जात आहे. एका महिन्यात दीडशे मिलीमीटर पाऊस तीनशे मिलीमीटरवर पोहोचला आहे. पावसाचे वितरण कमी अधिक झाले आहे, असेही अभ्यासकांनी नमूद केले.

आपण कल्पना करू शकणार नाही, अशा आपत्कालीन घटनांना आपणाला सामोरे जावे लागणार आहे, असे स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. ते म्हणाले, जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातही पाऊस होतो आहे. याबाबतच अहवालही सरकारला सादर केला होता आणि ही धोक्याची घंटा आहे, असे म्हटले होते. आता ढगफुटीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. दोन हजार सालापासून आपत्कालीन घटनांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईसारख्या शहरांत अशा घटना घडत असून, यास शहरांतील वाढते तापमान कारणीभूत आहे. शहरीकरण म्हणजे हवामान बदल होय. जेथे वने नष्ट झाली आहेत, तेथे स्थानिक स्तरावर हवामान बदल झाले आहेत. प्रदूषणामुळे तापमान वाढले आहे. जमिनीवर नैसर्गिकरीत्या जंगल असले पाहिजे. मात्र, जंगल नष्ट होत आहे.

नैऋत्य वारे जवळजवळ संपले आहेत. आता आपल्या बंगालच्या खाडीकडून आणि अरबी समुद्राकडून येणारे वारे पाहण्यास मिळतात. नैऋत्य मान्सून कमी झाला आहे. समुद्राचे तापमान वाढले आहे. परिणामी, वादळाचे प्रमाण वाढले आहे. समुद्राचे तापमान कमी हवे आणि जमिनीवरील तापमान अधिक हवे. मात्र, उलट झाले समुद्राहून मान्सूनचे वारे जमिनीवर येईनासे झाले आहेत. हे वारे जमिनीवर आले की, येथील तापमानात वाढ होत आहे. अशानेच स्थानिक स्तरावर हवामानात बदल झाले आहेत. त्यामुळे शहरात तापमान जास्त असल्याने शहरात जास्त पाऊस पडतो आहे. काही ठिकाणी काहीच पाऊस नाही आणि पडला तर पूर येईल, असा पाऊस येतो आहे. याला कारण जमिनीवर पोषक वातावरण नसल्याने असा पाऊस पडतो आहे. निसर्गात झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे अशा घटना घडत आहेत.

Web Title: The monsoon became erratic; Cloudburst increased by 15% with storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.