Join us

१० दिवसांचा मान्सून ब्रेक...  कोकणात मात्र धोधो बरसणार! मुंबई, उपनगरांत पावसाने ओलांडली सरासरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:12 PM

या ठिकाणी तुरळक मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई :  गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईसह राज्याला झोडपून काढणारा पाऊस आता दहा दिवस विश्रांती घेणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण वगळता राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही. दरम्यान, मोसमी पावसात जेव्हा खंड येतो; तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये पाऊस कोसळतो, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, कोकण आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी तुरळक मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यभरात आता पावसाचा खंड पडणार असतानाच जुलै महिन्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात विलंबाने दाखल झालेल्या आणि बऱ्यापैकी खंड पडलेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगलेच झोडपून काढले. विशेषतः १५ जुलैनंतर मुंबईसह राज्यभरात कोसळलेल्या पावसाने बहुतांशी ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण केली. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसाने सरासरीचा आकडा पार करत मुंबईकरांना झोडपले. 

सांताक्रूझ वेधशाळेत जुलै महिन्यात पावसाचा रेकॉर्ड ब्रेक-     भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सांताक्रूझ वेधशाळेत पावसाने जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी नोंद केली आहे. -  आताच्या नोंदीनुसार या वेधशाळेत पावसाने २००० मिलीमीटर एवढा आकडा क्रॉस केला आहे.-     भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील चार दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार कोकण आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत पडलेला एकूण पाऊसशहर - १६२३ मिमीपूर्व उपनगर - १८६४ मिमीपश्चिम उपनगर - १९६८ मिमी

मुंबईत झालेला पाऊस - ७१.४१%शहर - ७०.२६%उपनगर - ६८.८५% 

टॅग्स :मुंबईपाऊस