मुंबई/पुणे : मान्सूनने सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला असून, उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, राज्यामध्ये पुढील दोन-तीन दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे. मंगळवारी कोकण व उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने होत असल्याचे चित्र असून, मान्सूनने राज्यातील काही भाग वगळता मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्हा व्यापला आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक भागातही प्रवेश केला आहे.
सोमवारचा पाऊस मुंबई ६८ मिमी ठाणे २२.७ मिमी पुणे ७.६ मिमी महाबळेश्वर १५ मिमी सांगली ५ मिमी रत्नागिरी ०.२ मिमी धाराशिव २ मिमी परभणी ०.२ मिमी