मान्सून एक्सप्रेस : महाराष्ट्रात १६ टक्के अधिकचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:11 PM2020-08-18T16:11:12+5:302020-08-18T16:11:40+5:30
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद
सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईसहमहाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असतानाच १ जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. या काळात राज्यात ७१३.७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. मात्र जोर वाढल्याने पावसाची नोंद ८२६.७ मिलीमीटर एवढी झाली आहे. तर मुंबई शहरात ६८ टक्के आणि उपनगरात ६० एवढया अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोरदार मारा कायम राहणार आहे. राज्यातील अनेक धरणांनी पातळी ओलांडली असतानाच मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या जिल्हयांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर नंदुरबार, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्हयांत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
.....................
विभागवार पाऊस (टक्क्यांत)
कोकण २२
मध्य महाराष्ट्र २९
मराठवाडा ३६
विदर्भ उणे ९
.....................
कोणत्या जिल्हयात, किती पाऊस (टक्क्यांत)
मुंबई शहर ६८
मुंबई उपनगर ६०
रायगड २
रत्नागिरी २०
सिंधुदुर्ग ४१
धुळे ४१
अहमदनगर ९८
पुणे १६
सांगली २०
कोल्हापूर ८
सोलापूर ७१
औरंगाबाद ८७
जळगाव १०
बीड ७७
उस्मानाबाद २१
लातूर २०
जालना ४३
बुलढाणा ५
परभणी १४
हिंगोली ७
वाशिम १०
नागपूर ७
.....................
या जिल्हयात उणे पाऊस (टक्क्यांत)
पालघर -१०
ठाणे -६
नाशिक -४
नंदुरबार -२८
सातारा -१४
नांदेड -६
अकोला -३२
अमरावती -२३
यवतमाळ -२६
वर्धा -१०
चंद्रपूर -७
भंडारा -७
गडचिरोली -१८
गोंदिया -२३