सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईसहमहाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असतानाच १ जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. या काळात राज्यात ७१३.७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. मात्र जोर वाढल्याने पावसाची नोंद ८२६.७ मिलीमीटर एवढी झाली आहे. तर मुंबई शहरात ६८ टक्के आणि उपनगरात ६० एवढया अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोरदार मारा कायम राहणार आहे. राज्यातील अनेक धरणांनी पातळी ओलांडली असतानाच मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या जिल्हयांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर नंदुरबार, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्हयांत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
.....................
विभागवार पाऊस (टक्क्यांत)कोकण २२मध्य महाराष्ट्र २९मराठवाडा ३६विदर्भ उणे ९.....................
कोणत्या जिल्हयात, किती पाऊस (टक्क्यांत)मुंबई शहर ६८मुंबई उपनगर ६०रायगड २रत्नागिरी २०सिंधुदुर्ग ४१धुळे ४१अहमदनगर ९८पुणे १६सांगली २०कोल्हापूर ८सोलापूर ७१औरंगाबाद ८७जळगाव १०बीड ७७उस्मानाबाद २१लातूर २०जालना ४३बुलढाणा ५परभणी १४हिंगोली ७वाशिम १०नागपूर ७.....................
या जिल्हयात उणे पाऊस (टक्क्यांत)पालघर -१०ठाणे -६नाशिक -४नंदुरबार -२८सातारा -१४नांदेड -६अकोला -३२अमरावती -२३यवतमाळ -२६वर्धा -१०चंद्रपूर -७भंडारा -७गडचिरोली -१८गोंदिया -२३