मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी देशात मान्सूनची स्थिती सर्वसाधारण असणार आहे. मात्र पूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, जुन महिन्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत कमी पाऊस होईल. तर जुलै महिना पुर्णत: कोरडा जाईल. यानंतर येणा-या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मात्र मुसळधार पाऊस कोसळेल. एकंदर यावर्षीदेखील मान्सून गतवर्षीचाच कित्ता गिरवेल.
हवामान खात्याने अद्यापही स्थानिक आणि महिनागणिक मान्सूनचा अंदाज वर्तविलेला नाही. मात्र सरकारी माहितीनुसार, ओडिशा, पश्चिम बंगाल, मिझोराम सर्वसामान्य पावसाच्या तुलनेत कमी पाऊस होईल. तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. देशातील बहुतांश ठिकाणी सर्वसाधारण पाऊस ४० ते ५० टक्के होईल, असा अंदाज आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ५० ते ६० टक्के अधिक पाऊस होईल. जुन आणि जुलै महिन्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, मराठवाडा, विदर्भ येथे पावसाचे प्रमाण काहीसे कमी असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
-----------------------
- एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात देशातील उष्णता वाढत होती.
- काही ठिकाणी कोसळलेल्या पावसामुळे तापमानात वाढ झाली नाही.
- देशात अद्याप मोठया प्रमाणावर उष्णतेची लाट आलेली नाही.
- मेच्या पहिल्या दहा दिवसांत अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे.
- मध्य भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवास येईल.
- महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे.
-----------------------
तापलेली शहरे
अकोला ४४.३गांधीनगर ४४अहमदाबाद ४३.६अमरेली ४३.५परभणी ४३.५बडोदा ४३.३जळगाव ४३.२
-----------------------