मान्सून मराठवाड्यासह विदर्भात दाखल, हवामान विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:11 AM2019-06-23T07:11:06+5:302019-06-23T07:11:26+5:30

अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा पुढील प्रवास आणखी वेगाने होत असून, मान्सून शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात दाखल झाला आहे.

Monsoon filed with Marathwada in Vidarbha, information about weather department | मान्सून मराठवाड्यासह विदर्भात दाखल, हवामान विभागाची माहिती

मान्सून मराठवाड्यासह विदर्भात दाखल, हवामान विभागाची माहिती

Next

मुंबई  - अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा पुढील प्रवास आणखी वेगाने होत असून, मान्सून शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात दाखल झाला आहे. दरम्यान, मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असतानाच मराठवाड्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासून चांगला पाऊस झाला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून दोन दिवसांत महाराष्टÑ व्यापेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, २२ जून रोजी मान्सून रत्नागिरी, सांगली, सोलापूर, अदिलाबाद, मराठवाड्यासह ब्रह्मपुरी, गोरखपूर आणि वाराणसीमध्ये दाखल झाला आहे.

मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात दाखल होईल.

दरम्यान, २५ आणि २६ जून रोजी समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

आज रायगडमध्ये मुसळधार
उत्तर कोकण - २३ जून रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकण - २३ आणि २६ जून रोजी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र - २३ जून रोजी जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा : २३ जून रोजी औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई राहणार
ढगाळ
२३ आणि २४ जून : मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे
३३, २६ अंशांच्या आसपास राहील.
 

Web Title: Monsoon filed with Marathwada in Vidarbha, information about weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.