Join us

अखेर मान्सून मुंबईत दाखल; हवामान खात्याने केली घोषणा

By सचिन लुंगसे | Published: June 25, 2023 10:55 AM

पुढील काही महिने मुंबईकरांना सरासरी पावसाला सामोरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच  रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली. मानसून मुंबईसोबत दिल्लीतदेखील दाखल झाला असून, सलग लागून राहिलेल्या पावसाने मुंबईला अखेर गारे गार केले आहे. परिणामी मुंबईकरांची उकाडाच्या तावडीतून सुटका झाली असून आता पुढील काही महिने मुंबईकरांना सरासरी पावसाला सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या २४ तासांत म्हणजे शनिवारी सकाळी ८.३० पासून रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सगळ्यात जास्त पाऊस सायंकाळी ५.३० ते रात्री ७.३० या वेळेत पडला आहे. या काळात ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शनिवारी रात्रभर मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पावसाने हजेरी लावली. रवीवारी पहाटे देखील मुंबईत ठीक ठिकाणी पावसाची रिमझिम हजेरी लागत असल्याचे चित्र होते. विशेषतः दक्षिण आणि मध्य मुंबईच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या.तलाव क्षेत्रात किती पाऊस झाला / मिमी 

वैतरणा ९०तानसा २२विहार १३७तुळशी १२२भातसा २७मध्य वैतरणा १०

टॅग्स :पाऊसमानसून स्पेशल