लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईला झोडून काढले. ९ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत २२०.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरात १०२.२९, पूर्व उपनगरांत १६९.१७ आणि पश्चिम उपनगरांत १३७.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
येथे दिवसभर पडलेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत सहा ठिकाणी झाडे पडली. ३२ ठिकाणी झाडे पडली. १४ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. सायन व कुर्ला रेल्वेस्थानकादरम्यान पाणी आल्याने रेल्वेची वाहतूक ठाणे ते सीएसएमटीदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. हार्बर रेल्वेची वाहतूक वडाळा ते वाशीपर्यंत बंद होती. पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरू होती.
बेस्टला याचा फटका बसल्याने कुर्ला कमानी ते बैलबाजार, पिंकी सिनेमा, हिंदमाता, एअर इंडिया कॉलनी, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, आरसीएस कॉलनी, अंधेरी मार्केट, दहिसर चेक नाका येथे वाहतूक वळविण्यात आली होती.
..............................