मान्सूनची आभाळमाया, २३ राज्यांत बरसणार, देशभरात धो धो; आसाममध्ये पूरस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 08:23 AM2023-06-26T08:23:33+5:302023-06-26T08:23:59+5:30
Monsoon News: मान्सूनने यावर्षी प्रतीक्षा करायला लावली असली तरी देशभरात तो धो धो बरसत आहे. मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी दिल्लीत दाखल झाला, तर मुंबईत दोन आठवडे उशिरा झाला, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
नवी दिल्ली / मुंबई - मान्सूनने यावर्षी प्रतीक्षा करायला लावली असली तरी देशभरात तो धो धो बरसत आहे. मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी दिल्लीत दाखल झाला, तर मुंबईत दोन आठवडे उशिरा झाला, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. वातावरण अनुकूल निर्माण झाल्यामुळे देशभरात वहतुशि भागात मान्सून जोरदार सक्रीय झाला आहे. पुढील चार सुमारे २३ दिवस देशातील २३ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.देशात मान्सून ७ दिवस उशीरा दाखल झाला. मात्र, विपोरजॉय चक्रीवादळामुळे तो केरळमध्येच रखडला होता. आता मान्सूनची वाटचाल सुसाट झाली आहे. एकच दिवशी महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये तो धडकला. आयएमडीनुसार, मान्सूनने महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगड, ओडिशा, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश. प्रदेश उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा राज्य व्यापले आहे. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या मोठ्या जम्मू आणि भागांसह उत्तर भारतातील बहुतांश भागात मान्सून वेळापत्रकानुसार किंवा किंचित आधी पोहोचला आहे. मध्य भारतातील काही भागाला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
आसाममध्ये शेकडो गावे पाण्याखाली
सध्या १.११८ गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये ८४६९.५६ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. असे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. मुसळधार पावसामुळे चार लाखांहून अधिक लोकांना महापुराचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.
हिमाचलला धुतले
हिमाचलमध्ये सोलन जिल्ह्यात अर्कोमध्ये ढगफुटी झाली, ज्यामुळे ३० ते शेळ्या वाहून गेल्या. मंडी जिल्ह्यातील राज खोयात तुगाधर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेली. पांडोह धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. कुलूच्या मोहल नाल्यात नरोनी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर उभी केलेली अनेक वाहने पाण्यात वाहून गेली.
वाहून जाणाऱ्या कार चालक महिलेची सुटका
हरयाणात २० जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वीज पडल्याने सोनपतच्या गन्नौर रेल्वेस्थानकाची सर्व सर्व्हर यंत्रणा, सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. पंचकुलामध्ये घग्गर नदी ओलांडताना सातजण अडकले होते. यापूर्वी एक कार या नदीत अडकली होती. कारचालक महिलेला लोकांनी खूप प्रयत्नानंतर बाहेर काढले.
रेल्वे स्टेशनवर विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर एका महिलेचा विचित्र पद्धतीने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. साक्षी आहुजा असे तिचे नाव आहे. डबक्यात पडू नये, म्हणून तिने विजेच्या खांबाला धरले आणि तिला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला.