Join us

मान्सून : मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:11 AM

१) ३१ ऑगस्टपर्यंत झालेला एकूण पाऊस ?(जून, जुलै, ऑगस्ट)मुंबई शहर : १ हजार ७२७.१ मिलीमीटर (सरासरीच्या तुलनेत ...

१) ३१ ऑगस्टपर्यंत झालेला एकूण पाऊस ?

(जून, जुलै, ऑगस्ट)

मुंबई शहर : १ हजार ७२७.१ मिलीमीटर (सरासरीच्या तुलनेत पावसाची घट ३ टक्के)

मुंबई उपनगर : १ हजार ९४७.१ मिलीमीटर (सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के अधिक पाऊस)

२) सरासरी

अ) मुंबई शहरात सरासरीच्या तुलनेत ३ टक्के कमी पाऊस पडला आहे.

ब) मुंबईच्या उपनगरात सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

३) मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती नाही.

४) ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध जलसाठा? (उपयुक्त पाण्याचा साठा दशलक्ष लिटर्समध्ये)

अप्पर वैतरणा - १८१९४९

मोडक सागर - ११६४३१

तानसा - १४३४१६

मध्य वैतरणा - १८३५६३

भातसा - ६५५७९५

विहार - २७६९८

तुळशी - ८०४६

५) पावसाचा खंड

जून आणि जुलै महिन्यात मुंबईत बऱ्यापैकी पाऊस झाला. जुलै महिन्यात २०० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या काळात झालेला पाऊस हा सरप्लस म्हणजे अधिक नोंदविण्यात आला. ऑगस्ट महिन्यात दोन वेळा पावसात खंड पडला. एक म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठड्यात आणि दुसरा खंड म्हणजे उत्तरार्ध.