Join us

मुंबापुरीत परतीचा पाऊस

By admin | Published: October 01, 2014 2:29 AM

एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असताना परतीचा पाऊसही मुंबईत धडाक्यात मेघगजर्नेसह मुंबापुरीत दाखल झाला आणि चाकरमान्यांची एकच धावपळ उडाली.

मुंबई : एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असताना परतीचा पाऊसही मुंबईत धडाक्यात मेघगजर्नेसह मुंबापुरीत दाखल झाला आणि चाकरमान्यांची एकच धावपळ उडाली. 
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना सायंकाळच्या पावसाने दिलासा दिला असला तरी पुढील काही दिवसांत मुंबईकर ऑक्टोबर हीटने घामाघूम होणार आहेत. परतीच्या पावसात सलग पाच दिवसांचा खंड पडल्यास त्यानंतर तो पुन्हा बरसणार नाही. राजस्थानातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. एक ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातही परतीचा पाऊस दाखल झाला आहे. उत्तरेकडील राज्यांसह ईशान्येकडील राज्यांचा प्रवास 
करत हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. 
एक ऑक्टोबरपूर्वीच परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यातच सप्टेंबर महिन्यात मुंबईकरांना येथील वातावरण घाम फोडत असताना ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वसंध्येला मेघगजर्नेसह मुंबापुरीत दाखल झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने एका अर्थाने ऑक्टोबर हीटला सलामीच दिली. (प्रतिनिधी)
 
च्गेल्या पंधरा दिवसांपासून न बरसलेला पाऊस अखेर परतीच्या मार्गावर असताना मुंबईत दाखल झाला आहे. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने मुंबापुरीचे कमाल तापमान 34 अंशांवर पोहोचले होते. 
च्सोमवारी तर कमाल तापमान 37 अंश एवढे नोंदविण्यात आले. आता ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले असले तरीदेखील पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याचे हे पूर्वसंकेतच जणू काही मुंबईकरांना मिळाले आहेत. 
 
वीज म्हणाली..
सूर्य अस्ताला जात नाही तोच मुंबापुरीवर दाटलेल्या काळ्य़ाकुट्ट ढगांची चादर आच्छादली. पाहता पाहता  स्तब्ध झालेला वारा एकाकी वादळ झाला. आणि मग आकाशात पसरलेल्या काळोखात विजांचा थयथयाट सुरू झाला. वादळी वा:यासह मंगळवारी सायंकाळी दाखल झालेल्या पावसाने मुंबापुरीला झोडपून काढले आणि अशीच कुठून तरी भिन्न काळोखात कडाडलेली वीज सीएसटीच्या प्रकाशाला छेदून गेली.