पावसाळ्यापूर्वीच साथीचे आजार

By admin | Published: May 23, 2016 03:30 AM2016-05-23T03:30:23+5:302016-05-23T03:30:23+5:30

पावसाळ्यापूर्वीच मुंबईत साथीच्या आजारांची सुरुवात झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गॅस्ट्रो, मलेरिया आणि लेप्टोचे रुग्ण जानेवारी महिन्यापासून आढळत आहेत.

Monsoon sickness before monsoon | पावसाळ्यापूर्वीच साथीचे आजार

पावसाळ्यापूर्वीच साथीचे आजार

Next

मुंबई : पावसाळ्यापूर्वीच मुंबईत साथीच्या आजारांची सुरुवात झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गॅस्ट्रो, मलेरिया आणि लेप्टोचे रुग्ण जानेवारी महिन्यापासून आढळत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईकरांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबईत जुलै २०१५मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर लेप्टोची साथ पसरली होती. गेल्या वर्षी लेप्टोमुळे १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर, २०१४मध्ये लेप्टोमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी मुंबईत पसरलेली लेप्टोची साथ यंदाही डोके वर काढू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जानेवारी ते एप्रिलदरम्यान लेप्टोचे २० रुग्ण आढळले आहेत. तर, गॅस्ट्रोचे ३ हजार १९५ रुग्ण आढळले आहेत. पावसाचे आगमन झाल्यावर या आजारांमध्ये वाढ होऊ शकते.
पाणी साचून राहिल्याने त्यात डासांची पैदास होते आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या आजारांचा धोका वाढतो. यंदा कडक उन्हाळा असूनही १ हजार २०५ जणांना मलेरिया तर ८७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. कोणत्याही ठिकाणी सात दिवसांहून अधिक काळ पाणी साठू देऊ नये. स्वच्छ पाणी प्यावे. उकाडा सुरू असला तरी बाहेरचे खाणे, पेय टाळावीत, असे आवाहन महापालिका करत आहे.
पावसाळ्यातील साथींच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. लेप्टोला आळा घालण्यासाठी पाळीव प्राण्यांची (गाय, म्हैस, कुत्रा) तपासणी करण्याच्या दृष्टीने यांच्यावर उपचार करून घेण्यास मालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्राण्यांमुळे लेप्टो होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर बांधकामाच्या ठिकाणी पाहणी सुरू असल्याचे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आजारांची आकडेवारी
आजार२०१६ २०१५२०१४२०१३२०१२
गॅस्ट्रो३१९५११०३१११०४६१२,६२३१२,२८७
मलेरिया१,२०५७,५१७९,६०८१०,५६५१६,०८६
डेंग्यू८७९१९८६१९२७१००८
लेप्टो२०१७६७९२३३३२७
स्वाइन फ्लू२३०२९११७७३६०

Web Title: Monsoon sickness before monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.