Monsoon Update: आजपासून राज्यात ‘जोर’धारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:33 AM2022-06-19T08:33:07+5:302022-06-19T08:33:38+5:30

Monsoon Update: मान्सूनची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रातून पुढे सरकलेला मान्सून आता झारखंड आणि बिहारच्या काही भागांत दाखल झाला आहे.

Monsoon Update: 'Jor' trend in the state from today | Monsoon Update: आजपासून राज्यात ‘जोर’धारा

Monsoon Update: आजपासून राज्यात ‘जोर’धारा

Next

 मुंबई : मान्सूनची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रातून पुढे सरकलेला मान्सून आता झारखंड आणि बिहारच्या काही भागांत दाखल झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात तो मध्य प्रदेशच्या आणखी भागासह लगतच्या परिसरात दाखल होण्यासाठीचे हवामान अनुकूल असतानाच, आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण व उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. 

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण कोकणात सोमवारपासून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर,
अतिरिक्त महासंचालक,
भारतीय हवामान शास्त्र विभाग

Web Title: Monsoon Update: 'Jor' trend in the state from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.