Monsoon Update ( Marathi News ) : मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता यावर्षी पाऊस कधी सुरू होईल आणि कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मान्सूनबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. हवामान खात्यानुसार यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार आहे. नैऋत्य मान्सून वेळेपूर्वी अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून देशाच्या इतर भागांकडे सरकणार आहे. दरवर्षी मान्सून अंदमान निकोबारमध्ये २२ मे रोजी दाखल होतो. पण या वर्षी ३ दिवस आधीच दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD)परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत, असंही हवामान विभागाने म्हटले आहे. (Monsoon Update)
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार?
नैऋत्य मान्सून १९ मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर ते १ जून दरम्यान केरळमध्ये पोहोचेल. बंगालच्या उपसागरातून भारताच्या मुख्य भूमीकडे मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे, त्यामुळे १९ मेपर्यंत मान्सून भारतीय हद्दीत दाखल होईल, असा अंदाज आहे.
दरवर्षी मान्सून २२ मे रोजी दाखल होतो यावर्षी मान्सून १९ मे रोजी दाखल होणार आहे. तर महाराष्ट्रातही लवकर मान्सून येणार आहे. महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दिल्लीत मान्सूनला ३० जून रोजी सुरूवात होऊ शकते. त्याआधी १० जूनला चेन्नईत सुरुवात होणार आहे. (Monsoon Update)
भारतात या वर्षी मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाही आयएमडीने मे महिन्यात सामान्यपेक्षा जास्त पावसाचा (Rain) अंदाज वर्तवला होता. तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळ आणि पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सून १९ मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर ते १ जून दरम्यान केरळमध्ये पोहोचेल. बंगालच्या उपसागरातून भारताच्या मुख्य भूमीकडे मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे, त्यामुळे १९ मेपर्यंत मान्सून भारतीय हद्दीत दाखल होईल, असा अंदाज आहे.