Monsoon Update : या वर्षी मान्सून कसा असेल, पावसाला सुरुवात कधीपासून होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:25 IST2025-04-06T15:23:45+5:302025-04-06T15:25:45+5:30
Monsoon Update : या वर्षीचा पाऊस कधीपासून सुरू होणार? याबाबत हवामान विभागाने पहिला अंदाज जाहीर केला आहे.

Monsoon Update : या वर्षी मान्सून कसा असेल, पावसाला सुरुवात कधीपासून होणार?
Monsoon Update ( Marathi News ) : देशभरातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. हवामान विभाग (IMD) पावसाचा अंदाज जाहीर करत असते, या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या वर्षी हवामान विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावली आहे.
अल निनो हे मध्य उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या तापमानवाढीमुळे होते. याचा परिणाम भारतात मान्सून दरम्यान होणाऱ्या पावसावर होतो. यामुळे पावसाचा वेग मंदावतो. याबाबत आयएमडीचे मुख्य प्रशासक एम. महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, "हवामान अंदाज आणि आंतरराष्ट्रीय अंदाजांच्या आधारे, आपण मान्सूनसाठी एल निनोची शक्यता नाकारू शकतो. यावर्षी आपल्याला तटस्थ एल निनो परिस्थिती दिसू शकते. ( Monsoon Update )
'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप
२०२३ मध्ये एल निनोमुळे खूप त्रास झाला. यामुळे, पावसाळ्यात ६% घट नोंदवण्यात आली. तर गेल्या वर्षी ८% जास्त पाऊस पडला होता.
हवामान विभाग अंदाज व्यक्त करत असते
एल निनो म्हणजे मध्य प्रशांत महासागरातील तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने वाढते. म्हणजे तापमानात लक्षणीय वाढ होत नाही. भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडला आहे. आयएमडी दरवर्षी एप्रिलमध्ये मान्सून पावसाचा पहिला अंदाज जाहीर करत असते.
या वर्षीच्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला एप्रिल महिन्याच्या अंदाजाची वाट पाहावी लागेल, असंही महापात्रा म्हणाले. "हिंद महासागर आणि आजूबाजूच्या समुद्री क्षेत्रांवरील परिस्थिती देखील अंदाजात महत्त्वाची आहे, असंही त्यांनी सांगितले. ( Rain Update)
उष्णतेचा पारा वाढला
देशात उष्णतेचा पारा वाढला आहे. या उन्हाळ्यात मान्सूनपूर्वी भारताला सामान्यपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागेल. एप्रिल ते जून दरम्यान, भारतात सरासरी चार ते सात उष्णतेच्या लाटेचे दिवस असतात. या वर्षी पूर्व भारतातील काही भागात १० दिवसांपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते," असे महापात्रा म्हणाले. ( Monsoon Update)