जून महिन्यातील १५ तारीख संपली तरीही अजुनही मान्सून राज्यात दाखल झालेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. आता मान्सून संदर्भात हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. पुणे आणि मुंबई मध्ये १८ जून ते २२ जून दरम्यान मान्सूनचा पाऊस पडू शकतो, सामान्यपेक्षा जवळपास एक आठवडा उशीरा, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा
पुण्यात मान्सून सुरू होण्याची तारीख १० जून होती, तर मुंबईसाठी ११ जून होती. पण बिपरजॉय या वादळामुले मान्सून येण्यास विलंब झाला.
१८ जून ते २२ जून या कालावधीत पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील अधिक भागात मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल. मात्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनची प्रगती होण्यास आणखी वेळ लागेल, असे ते म्हणाले. १८ जून ते २१ जून या कालावधीत दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारत आणि लगतच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचेही आयएमडीने गुरुवारी सांगितले.
राज्याच्या उत्तर भागात तसेच विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले.