Join us

१०-११ ऑगस्टपासून मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 6:26 PM

शुक्रवारी विश्रांती घेत शनिवारी पुन्हा एकदा दणका दिला.

मुंबई : सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग चार दिवस मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने शुक्रवारी विश्रांती घेत शनिवारी पुन्हा एकदा दणका दिला. विशेषत: मुंबईच्या उपनगरात सकाळ वगळता दुपारी आणि सायंकाळी पावसाने झोडपधारा कायम ठेवल्या. असे असतानाच आता १० आणि ११ ऑगस्टपासून मुंबईसह पश्चिम किना-यावर मान्सून सक्रिय होईल. शिवाय आठवडाभर मान्सून सक्रीय असण्याची स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आता पुन्हा एकदा कोकणासह मुंबईला पावसाचा जोरदार तडाखा बसणार आहे. शनिवारी मुंबईत अधून मधून पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी घरांचा भाग पडला. ९७ ठिकाणी झाडे कोसळली. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. दरम्यान, पावसाची अधून मधून हजेरी लागत असतानाच कुलाबा येथे ०.८ तर सांताक्रूझ येथे ४.३ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली असून, रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसमुंबई