राज्यात आठवडाभर मान्सून राहणार सक्रिय, मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:34 AM2020-09-14T02:34:30+5:302020-09-14T06:00:52+5:30

मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासांत पडणाऱ्या पावसामुळे पडझड सुरूच असून, ७ ठिकाणी झाडे कोसळली, तर २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

Monsoon will remain active in the state for a week. Mumbai has received 102.04 per cent rainfall so far | राज्यात आठवडाभर मान्सून राहणार सक्रिय, मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला

राज्यात आठवडाभर मान्सून राहणार सक्रिय, मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला

Next

मुंबई : राज्यभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबई, ठाण्यासह लगतच्या प्रदेशात ५० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासांत पडणाऱ्या पावसामुळे पडझड सुरूच असून, ७ ठिकाणी झाडे कोसळली, तर २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. मुंबईत सोमवारी अधूनमधून पावसाचा जोर राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १४, १५ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल. १६ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस पडेल. १७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल.

Web Title: Monsoon will remain active in the state for a week. Mumbai has received 102.04 per cent rainfall so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.