लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस आता शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असून, हवामान खात्याच्या नव्या वेळापत्रकानुसार येत्या ८ आॅक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असले, तरी दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असतानाच कोकणात पश्चिमी वारे वाहतील. येत्या दोन ते तीन दिवसांत दक्षिण कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल.दरम्यान, शनिवारी दिवसभर मुंबईत पावसाने चांगला मुक्काम ठोकला होता. सकाळपासून सुरू झालेली रिमझिम सायंकाळपर्यंत कायम होती.केव्हा कुठे दाखल झाला मान्सूनच्अंदमानात १७ मेच्केरळमध्ये १ जूनच्१४ जून रोजी मुंबईसह महाराष्ट्रच्२६ जून रोजी संपूर्ण देश व्यापलापरतीच्यापावसाच्यातारखा (आॅक्टोबर)च्कोल्हापूर - ११च्सातारा - ९च्पुणे - ११च्मुंबई - ८च्अहमदनगर - ८च्जळगाव - ६च्नागपूर - ६
...अन् वेळापत्रक बदलले१९०१ ते १९४० दरम्यान १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मान्सून दाखल होण्याच्या, परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहेत.त्यामुळे मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार, हवामान खात्याने १९६१ ते २०१९ दरम्यान ५८ वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला.१९७१ ते २०१९ दरम्यानच्या ४८ वर्षांच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल करून यापूर्वीच्या तारखांचे वेळापत्रक बदलण्यात आले.