मान्सूनची ‘डबल सेंच्युरी’; जोरदार पाऊस सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 12:53 PM2020-07-05T12:53:54+5:302020-07-05T12:54:36+5:30

धडकी भरविणा-या पावसाने आपला जोर कायम ठेवला...

Monsoon's 'Double Century'; Heavy rain will continue | मान्सूनची ‘डबल सेंच्युरी’; जोरदार पाऊस सुरूच राहणार

मान्सूनची ‘डबल सेंच्युरी’; जोरदार पाऊस सुरूच राहणार

googlenewsNext

 

२४ तास : कुठे कोसळला किती पाऊस/मिमी

शहर - १५१.५१
पूर्व उपनगर - १८२.३
पश्चिम उपनगर - १५४.८९

मुंबई : धडकी भरविणा-या पावसाने आपला जोर शनिवारच्या दिवसाप्रमाणे रात्रीदेखील कायम ठेवला. विशेषत: मुंबईच्या उपनगरात शहराच्या तुलेतन अधिक पाऊस कोसळत होता. रात्रभर पाऊ स पडल्यानंतर रविवारी सकाळी साडेसाठ वाजता सांताक्रूझ येथे तब्बल २००.८ मिलीमीटर तर कुलाबा येथे १२९.६ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. महत्त्वाचे म्हणजे हा पाऊस कोसळत असतानाच ठिकठिकाणी पडझडीच्या देखील घटना घडल्या. येत्या २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

कुलाबा, नरिमन पॉइंट येथे रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सरासरी १० मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. येथे मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच पूर्व आणि पश्चिम उपनगरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. सकाळी नऊ नंतर मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर मोठया प्रमाणावर वाढला. सकाळी १० वाजेपर्यंत धारावी, दादर, वडाळा येथे सरासरी २० मिलीमीटर पाऊस पडला. कुर्ला, विक्रोळी, चेंबूर, मानखुर्द, भांडूप, गव्हाणपाडा, मुलुंड येथे सरासरी ३० मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. विलेपार्ले, मरोळ, वांद्रे, अंधेरी, दिंडोशी येथे सरासरी ४० मिलीमीटर पाऊस पडला. सकाळी ९ ते ११ दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने या सर्व परिसरात सरासरी पावसाची नोंद ५० मिलीमीटच्या आसपास पोहचली. दुसरीकडे मुंबईत पाऊस कोसळत असतानाच सखल भागात पाणी साचल्याने वांद्रे येथील नॅशनल कॉलेज आणि एस.व्ही. रोड येथील बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

.........................

१२ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला
६० ठिकाणी झाडे कोसळली
३५ ठिकाणी शॉर्टसर्किट

.........................

येथे साचले पाणी

हिंदमाता, काळबादेवी, भायखळा, वडाळा, अंधेरी, साकीविहार रोड, चेंबूर येथील सखल भागात पाणी साचले होते. महापालिकेने वेगाने येथील साचलेल्या पाण्याचा निचरा केला.

.........................

पडझड सुरु असतानाच लागली आग...

कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार येथील एका दुकानावर रविवारी सकाळी ८ वाजता झाड पडल्याची घटना घडली. विक्रोळी पार्क साईट येथील ३५ माळ्याच्या इमारतीच्या १९ मजल्यावरील साईन बोर्डला शनिवारी रात्री ८ वाजता आग लागली. पावणे नऊ च्या सुमारस ही आग विझली. कांदिवली येथील बंदर पाखडी रोडवरील एका दुकानाला शनिवारी मध्यरात्री सव्वा एक वाजता लागलेली आग रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास विझली.

.........................

Web Title: Monsoon's 'Double Century'; Heavy rain will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.