पाणीकपातीबाबत महिनाभराने निर्णय

By admin | Published: June 13, 2015 04:14 AM2015-06-13T04:14:16+5:302015-06-13T04:14:16+5:30

मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ परंतु गतवर्षीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये जादा जलसाठा असल्याचा दिलासा पालिकेने

Monthly decision regarding water dispute | पाणीकपातीबाबत महिनाभराने निर्णय

पाणीकपातीबाबत महिनाभराने निर्णय

Next

मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ परंतु गतवर्षीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये जादा जलसाठा असल्याचा दिलासा पालिकेने
दिला आहे़ पावसाने पाठ फिरवल्यास मात्र महिनाभरानंतर पाणीकपातीचे संकेत पालिका प्रशासनाने दिले
आहेत़
पाणीबाणी ओढावल्यास पालिकेकडे कोणत्या उपाययोजना आहेत, असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी आज उपस्थित केला़ यावर स्पष्टीकरण देत तलावांमध्ये ५४ दिवसांचा जलसाठा असल्याने तूर्तास पाणीकपातीची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने सांगितले़
मात्र हीच परिस्थिती कायम राहिल्यास महिनाभरानंतर जलसाठ्याचा अंदाज घेऊन पाणीकपात अथवा तलावांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत
अतिरिक्त आयुक्त एस़ व्ही़ आऱ श्रीनिवास यांनी दिले़
(प्रतिनिधी)

Web Title: Monthly decision regarding water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.