मोरा-भाऊचा धक्का प्रवास २५ रु.नी महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 03:21 PM2024-05-20T15:21:07+5:302024-05-20T15:21:19+5:30
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.
उरण : मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात रविवारपासून २५ रुपयांची वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामासाठी ही दरवाढ केली जाते. यामुळे सागरी प्रवास दरवर्षीप्रमाणे महागणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. या वर्षीही जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात ८० रुपयांंवरून १०५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हाफ तिकीट दरातही ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ २६ मेपासूनच ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन यांनी दिली.
- दरवर्षी मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात इंधन दरवाढीचे पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत प्रत्येक पावसाळी हंगामात २० ते २५ रुपयांपर्यंत वाढ केली जाते. त्यानंतर वाढ करण्यात आलेली तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते.
- त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकीट दरवाढ केली जाते. मात्र २०२२ सालीच्या पावसाळी हंगामानंतर सीजन तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.