Join us

मोरा पोलीस ठाण्यावर हल्ला;11 जण अटकेत

By admin | Published: October 05, 2014 2:19 AM

उरणच्या मोरा सागरी पोलिस ठाण्यावर हल्ला करणा:या मोरा कोळीवाडयातील आरोपींचा आज दिवसभर कसून शोध घेण्यात आला.

चिरनेर : उरणच्या मोरा सागरी पोलिस ठाण्यावर हल्ला करणा:या मोरा कोळीवाडयातील आरोपींचा आज दिवसभर कसून शोध घेण्यात आला. दिवसभराच्या कोंबींग ऑपरेशनमध्ये आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून 41 जण अजूनही पसार असल्याची माहिती एसीपी शशिकांत बोराटे यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 11वर पोहोचली आहे. 
दोन दिवसांपूर्वी डीजे बंद करण्यावरून झालेल्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी दोघांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले असता मोरा गावक:यांनी पोलिस ठाण्यावरच हल्लाबोल केला होता. रहिवाशांनी दगडफेक आणि कर्मचा:यांना मारहाण केली होती. या मारहाणीत एक पोलिस कर्मचा:याच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर मोरा विभागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून तिथे एसआरपीची फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना अटक करवून देण्यास गावक:यांचा विरोध असल्याने प्रकरण कालपासून हाताबाहेर गेले आहे. आज दिवसभर पोलिसांनी मोरा गाव परिसरात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन केल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. येथील रस्त्यावर पोलिसच पोलिस दिसूत आहेत. उपायुक्त संजय ऐनपुरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत बोराटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. एस. पठाण हे स्वत: परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.(वार्ताहर)