शिक्षण सेवक भरती रद्द करण्यासाठी मोर्चा

By admin | Published: September 13, 2014 01:02 AM2014-09-13T01:02:05+5:302014-09-13T01:02:05+5:30

अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक उमेदवारासाठी आरक्षीत पदाची नोकरी भरती करताना राज्यपालांच्या अध्यादेशाचे पालन करणे बंधनकारक

Morcha to cancel recruitment of education staff | शिक्षण सेवक भरती रद्द करण्यासाठी मोर्चा

शिक्षण सेवक भरती रद्द करण्यासाठी मोर्चा

Next

पालघर : अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक उमेदवारासाठी आरक्षीत पदाची नोकरी भरती करताना राज्यपालांच्या अध्यादेशाचे पालन करणे बंधनकारक असूनही त्याचे पालन न करता जिल्हापरिषदेकडून परजिल्हयातील शिक्षण सेवकांची करण्यात आलेली भरती रद्द करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे. यासाठी शुक्रवारी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला.
वनाधिकार कायदा २००९, पेसा कायदा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अनिनियमानुसार अनुसूचित क्षेत्रातील लोकांच्या रुढी, परंपरा, सामुहिक साधनसंपत्ती आणि गौण वन उत्पादनावरील मालकी इ. चे रक्षण व जतन करण्यासाठी संबंधीत ग्रामसभांना व पंचायतींना अधिकार प्रदान केले असताना बेकायदेशीरपणे जमीन, जंगल, पाणी व इतर सामुहीक साधनाची जबरदस्तीने लुट सुरू असल्याचे एकता परिषदेचे म्हणणे आहे. राज्यघटनेमध्ये ५ वी व ६ वी अनुसूचिनुसार प्रकल्पाना अनुसूचीत क्षेत्रात प्रतिबंध असतानाही अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन, लोहमार्ग प्रकल्प, इंडस्ट्रीयल कॉरिडोअर, गॅस पाईपलाईन, फ्रेडकोरीडोअर, डायवे रूंदीकरण इ. प्रकल्प आदिवासींच्या जमीनीमधूनच प्रस्तावीत केले जात आहेत. आदिवासी कामगाराना बेकायदेशीररित्या विटभट्टी, मच्छीमार बोटी, वाडी मजुर, नाका कामगर, शेतमजुर इ. तत्सम क्षेत्रात रोजगारासाठी स्थलांतरीत केले जावून त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचे एकता परिषदेचे म्हणणे आहे. अनुसूचीत क्षेत्रातील बेकायदेशीर रित्या बळकाविलैल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वअधिकाराने परत मिळवून द्याव्यात, सामाजिक कार्यकर्त्यांवर लादण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करावेत, चार रस्ता चौकांचे बिरसा मुंडा चौक असे नामकरण करावे तसेच आदिवासी क्षेत्रातील गरीब व अशिक्षित घटकांचे जबरदस्तीने चालणारे धर्मांतर व सत्संगाच्या माध्यमातुन आदिवासींच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा बडगा उभारण्याच्या मागणीसाठी आज आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुराम धोदडे, दत्ताराम करबट, अशोक ठाकरे, सुनील पऱ्हाड, विनोद दुमाडा, किर्ती वरठा इ. च्या मार्गदर्शनाखाली सुमारे २ हजार आदिवासींचा मोर्चा चार रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी निवेदन स्विकारले.

Web Title: Morcha to cancel recruitment of education staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.